Join us

सलमान आणि रश्मिकाची जोडी पुन्हा झळकणार एकत्र, लवकरच 'A6'ची होणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:41 IST

Salman Khan and Rashmika Mandanna : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. 'सिकंदर'नंतर ही अभिनेत्री सलमानसोबत आणखी एक मोठा चित्रपट करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 'छावा'(Chhaava)नंतर रश्मिका पहिल्यांदाच सलमान खान(Salman Khan)सोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'सिकंदर' चित्रपटात सलमान आणि रश्मिकाला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. दरम्यान, सलमान आणि रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी ऐकायला मिळत आहे.

रश्मिका मंदाना पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिग्दर्शक ॲटलीच्या आगामी 'ए६' चित्रपटात दिसणार असल्याचे समजते आहे. 'पुष्पा २'मध्ये ॲटली आणि सलमानला रश्मिकाचा अभिनय आवडला होता, त्यामुळेच निर्मात्यांनी पुन्हा एकदा सलमान आणि रश्मिकाला एकत्र साईन करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी डिसेंबरमध्ये ॲटलीने कंफर्म केले होते की, त्याच्या आगामी सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि रश्मिकाची या सिनेमात वर्णी लागल्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. 'A6'वर काम सुरू असून लवकरच त्याची घोषणा होईल, असे सांगितले जाते. 

रश्मिका 'छावा'च्या प्रमोशनमध्ये आहे व्यस्त रश्मिका मंदाना सध्या तिच्या 'छावा' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटात अभिनेत्री विकी कौशलसोबत दिसणार आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्रीचा रॉयल लूक पाहायला मिळणार आहे.

 सलमानसोबत 'सिकंदर'मध्येही दिसणार रश्मिका'छावा'नंतर ही अभिनेत्री बॉलिवूडचा दबंग सलमान खानसोबत 'सिकंदर' चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान आणि रश्मिकाचा हा चित्रपट यावर्षी ईदला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. पण या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेत्याचा ॲक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :सलमान खानरश्मिका मंदाना