सलमान खान आणि बिपाशा बासू पुन्हा दिसणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 17:56 IST
सलमान खान आणि बिपाशा बासूने नो एंट्री या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री खूपच गाजली ...
सलमान खान आणि बिपाशा बासू पुन्हा दिसणार एकत्र
सलमान खान आणि बिपाशा बासूने नो एंट्री या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री खूपच गाजली होती. खऱ्या आयुष्यातही सलमान आणि बिपाशा हे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. बिपाशाच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीलादेखील सलमानने आवर्जून उपस्थिती लावली होती. बिपाशा काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला फिरायला गेली होती. आता तिथून ती परतली असून पुन्हा कामाला लागली आहे. सलमान खानच्या दबंग टूरमध्ये 2003मध्ये ती सहभागी झाली होती आणि आता त्याची ही टूर एप्रिल आणि मे महिन्यात पुन्हा जगभराचा दौरा करणार आहे आणि यावेळीदेखील या टूरमध्ये बिपाशाचा सहभाग असणार आहे. सलमानसोबत पुन्हा 14 वर्षांनंतर टूर करण्यासाठी ती खूपच उत्सुक आहे. याविषयी ती सांगते, "14 वर्षांनंतर दबंग टूर पुन्हा आयोजित करण्यात आली आहे. या कॉर्न्स्टचा अनेक वर्षांनंतर पुन्हा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 2003ला आम्ही ज्यावेळी या टूरसाठी गेलो होतो, त्यावेळी लाइव्ह परफॉर्मन्स देणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात होती. यंदादेखील खूप मोठे कॉर्न्स्ट जगभर करणार आहोत. आम्ही हाँगकाँग, न्यूझिलंड, सिडनी, मेलबर्न, मलेशिया अशा विविध ठिकाणी परफॉर्मन्स देणार आहोत. माझ्या 15 वर्षांच्या करियरमधील अनेक हिट गाण्यांवर मी नृत्य सादर करणार आहे. तसेच माझ्या नो एंट्री मधील प्रसिद्ध गाण्यावरही मी थिरकताना दिसणार आहे. सलमान आणि मी खूप वर्षांपासून खूप चांगले फ्रेंड्स आहोत. मी दरवर्षी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावते. तसेच अनेकवेळा आम्ही एकमेकांशी फोनवरून गप्पा मारतो."