Join us

'अंतिम'! संघर्षासाठी भाईजान-आयुष आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 17:59 IST

Antim : सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ठळक मुद्देसलमानच्या 'अंतिम'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानच्या बहुप्रतिक्षीत 'अंतिम : द फायनल ट्रुथ' या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेता आयुष शर्मा स्क्रीन शेअर करणार आहे. सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर भाईजानच्या या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.

गणेशोत्सवापूर्वी प्रदर्शित झालेलं 'अंतिम'चं पहिलं पोस्टर सलमानने इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान आणि आयुष समोरासमोर उभे असून ते एकमेकांकडे रोखून बघत आहेत. एकप्रकारे त्यांच्यात संघर्ष सुरु असून हा त्यांचा अंतिम (अखेरचा) संघर्ष असल्याची शक्यता दिसून येत आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरमधून सलमान पोलिसांची तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट दिसून येतंय. त्यामुळे या दोघांमधील संघर्ष पाहण्यास चाहते आतुर झाले आहेत. मात्र, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्यापही जाहीर झालेली नाही. प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्येही लवकरच असं लिहिलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख अजूनही गुलदस्त्यात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.  

टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीबॉलिवूड