सलमान खानची अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2017 16:12 IST
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची जोधपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सलमान या केसच्या सुनावणीसाठी काल रात्रीच जोधपूरला पोहोचला ...
सलमान खानची अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता
अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची जोधपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सलमान या केसच्या सुनावणीसाठी काल रात्रीच जोधपूरला पोहोचला होता. सकाळी 11 वाजता तो न्यायालयात हजर झाला होता. या सुनावणीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. या केसच्या सुनावणीच्यावेळी त्याची बहीण अलविरा अग्निहोत्रीदेखील त्याच्यासोबत होती. सलमानने परवाना संपलेली शस्त्र बाळगल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला होता तसेच याच शस्त्राने त्याने हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी काळवीटांची शिकार केली असादेखील आरोप याचिकाकर्त्यांनी त्याच्यावर केला होता. अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी झाली. सलमानची यात निर्दोष मुक्तता करण्यात आली. या अंतिम सुनावणीसाठी सलमानला कोर्टात उपस्थित राहाण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे तो त्याच्या बहिणीसोबत कालच जोधपूरला रवाना झाला होता. तो जोधपूरमधील हरी महल पॅलेस या हॉटेलमध्ये राहात होता. 1998सालच्या या केसमध्ये सलमानविरोधात चार केस आहेत. त्याने तीन वेगवेगळ्या ठिकाणी हरणांची शिकार केला असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यातील दोन केसमध्ये उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि आणखी एका केसची सुनावणी 25 जानेवारीला जोधपूर कोर्टात होणार आहे. सलमानची मुक्तता झाल्याने त्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे. Related Srories:‘जुडवा २’मध्ये सलमान खान दिसणार का डबल रोलमध्ये?