Join us

​सहजपणे शर्ट काढत नाही सलमान, कराव्या लागतात मिनत्या-विनंत्या!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 22:06 IST

जवळपास स्वत:च्या सर्वच चित्रपटात शर्टलेस सीनसाठी सलमान खान फेमस आहे. पण दिग्दर्शकाने म्हटले आणि सलमानने शर्ट काढला, असे होत ...

जवळपास स्वत:च्या सर्वच चित्रपटात शर्टलेस सीनसाठी सलमान खान फेमस आहे. पण दिग्दर्शकाने म्हटले आणि सलमानने शर्ट काढला, असे होत नाही. खरे तर यासाठी सलमानची बरीच मनधरणी करावी लागते. ‘सुल्तान’चे दिग्दर्शक अली अब्बास जाफर यांनी यासंदर्भात एक खुलासा केला आहे. एका मुलाखती अली अब्बास जाफर यांनी याबाबतचे सीक्रेट शेअर केले.मी सर्वप्रथम सलमानला सुल्तानची स्क्रीप्ट ऐकवली तेव्हा त्याने प्रत्येक गोष्टीला अतिशय पॉझिटीव्ह रिस्पॉन्स दिला. पण त्याचा एकच प्रश्न होता, हा पहेलवान काय लंगोटमध्ये लढणार?  मी हो म्हटल्यावर सलमान अचानक शांत झाला. खरे तर सलमान अतिशय लाजाळू स्वभावाचा आहे. शर्ट काढायला सांगितले की, सलमान लगेच काढतो, असे लोकांना वाटते. पण सलमानला शर्ट काढण्यासाठी राजी करणे सोपे काम नाही. ‘सुल्तान’मधल्या अशा एका एका सीनसाठी सलमानची किती मनधरणी करावी लागली, हे आमचे आम्हालाच माहित. सलमानने लंगोट नेसावी, ही चित्रपटाची गरज होती. जो मातीत कुस्ती खेळतो त्याला लंगोट नेसूनच आखाड्यात उतरावे लागते. पण यासाठी सलमान राजी होईना. मी कित्येक दिवस त्याचा पिच्छा पुरवला तेव्हा कुठे लंगोट नेसायला सलमान राजी झाला. केवळ याच एका पोशाखावर सलमानने जातीने लक्ष दिले. त्याच्या लांबीबद्दल तो प्रचंड कॉन्शियस होता, असे अली अब्बास जाफर यांनी सांगितले. हे सांगताना स्वत: अली यांनाही हसू आवरले नाही..निश्चितपणे तुम्हालाही ते आवरणार नाही...