Join us

काळवीटाची शिकार सलमाननेच केली-साक्षीदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 12:12 IST

सलमाननेच काळवीटवर गोळी झाळल्याचा दावा साक्षीदाराने करुन सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता ...

सलमाननेच काळवीटवर गोळी झाळल्याचा दावा साक्षीदाराने करुन सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता झाल्यावर, आता या प्रकरणातील साक्षीदार हरीश दुलानी समोर आला आहे. २००२ मध्ये घडलेल्या या प्रकरणाच्या सुरुवातीला हरीशनेच तक्रार करुन सलमानवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर हरीश तब्बल १४ वर्ष गायब होता. यादरम्यान त्याला बऱ्याचदा वॉरंटही बजावलं गेलं. मात्र एवढी वर्षं बेपत्ता असलेला हरीश आता अचानकपणे समोर आला आहे.