Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सलमान भडकला...लोकांनी लुलियाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 21:14 IST

सलमान खानने सांगितले, की सध्या तो लग्न करणार नाहीये. ज्या दिवशी तो लग्न करेल तेव्हा सर्वांना सांगेल. गर्लफ्रेंड लुलियाविषयी ...

सलमान खानने सांगितले, की सध्या तो लग्न करणार नाहीये. ज्या दिवशी तो लग्न करेल तेव्हा सर्वांना सांगेल. गर्लफ्रेंड लुलियाविषयी होत असलेल्या चर्चांवर सलमान नाराज झाला आहे. त्याचे म्हणणे आहे, की लोकांना एका महिलेच्या चारित्र्याविषयी आपली जबाबदारी समजली पाहिजे. - एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत 'सुल्तान'च्या या अभिनेत्याने गर्लफ्रेंड लुलियासोबत लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नांमुळे नाराज झाला. - तो म्हणाला, 'हे योग्य नाहीये. आम्ही प्रिती झिंटाच्या रिसेप्शनला सोबत गेलो होतो. परंतु यात काय चुकीचे आहे? जर मी एखाद्या तरुणीसोबत दिसलो तर याचा अर्थ असा नाही की मी तिच्याशी लग्न करेल. लोकांनी महिलांचा आदर केला पाहिले आणि ही आपली जबाबदारी आहे.'- 'माध्यमे म्हणताय, की सलमान या तारखेला लग्न करणार त्या तारखेला लग्न करणार आहे. परंतु जेव्हा लग्न होत नाही तेव्हा त्या मुलीलाच याचे सर्वात जास्त दु:ख होते. असे बोलून तुम्ही त्या मुलीची अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली.'- मीडिया तिची आदर करतात, मग ते भारतीय असो परदेशातील. त्यामुळे माज्यावर दबाव येतो. ही चांगली गोष्ट नाहीये. - 'एक दिवस मी म्हणेल माझे लग्न झाले आहे आणि दुसºया दिवशी नकार देईल. पुन्हा म्हणेल लग्न तर खूप दिवसांपूर्वी झाले होते. दोन मुले आहेत, त्यांची नावे आमिर आणि शाहरुख आहेत. दुसºया दिवशी पुन्हा म्हणले, तुम्हाला याच्याशी काय घेणं-देणं.'