Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सलमान आणि आमिरचं घडलंय बिघडलंय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 13:32 IST

दबंग सलमान खान आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानची मैत्री सगळ्यांनाच माहिती. दोघंही एकमेकांचं कौतुक करताना थकत नाहीत. विशेषतः एकमेकांचे ...

दबंग सलमान खान आणि मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमिर खानची मैत्री सगळ्यांनाच माहिती. दोघंही एकमेकांचं कौतुक करताना थकत नाहीत. विशेषतः एकमेकांचे सिनेमा आणि त्यांच्या भूमिका. मात्र आता या दोन खान बंधूंमध्ये शीतयुद्ध रंगल्याचं ऐकू येतंय. याला निमित्त ठरलंय ते सुलतान आणि दंगल सिनेमा. हे दोन्ही सिनेमा कुस्तीवर आधारित आहे. दोघांचे सिनेमा वेगवेगळे आहेत असा दोघांनाही विश्वास होता. त्यामुळं सुरुवातीला दोघांनीही स्पोर्टिंग घेत आपापल्या सिनेमाचं शुटिंग सुरु ठेवलं. त्यात सलमानचा सुलतान ईदला तर आमिरचा दंगल सिनेमा डिसेंबरमध्ये रिलीज होतोय. मात्र सुलतानचा ट्रेलर आऊट झाल्यापासून आमिर सलमानवर नाराज झालाय. कारण दंगलमध्ये असलेल्या ब-याच गोष्टी सुलतानमध्ये आहेत. इतकंच नाही तर कुस्तीमधील धोबीपछाड करण्याची ट्रिकसुद्धा सुलतानमध्ये आहे. धोबीपछाड ट्रिक दंगलचं खास आकर्षण असेल असं आमिरला वाटत होतं. मात्र यांतही सलमाननं धोबीपछाड दिल्यानं आमिर त्याच्यावर भलताच संतापलाय.