सलमान, अक्षय, अजय हे सोनालीचे गुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:48 IST
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अनुसार सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन यांचे अनेक चित्रपट पाहून ती अॅक्शन शिकलीय.अकीराच्या ...
सलमान, अक्षय, अजय हे सोनालीचे गुरु
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या अनुसार सलमान खान, अक्षय कुमार आणि अजय देवगन यांचे अनेक चित्रपट पाहून ती अॅक्शन शिकलीय.अकीराच्या ट्रेलर लाँचप्रसंगी तिचा कोणता फेव्हरेट अॅक्शन को-स्टार आहे हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली, सलमान हा दबंग, अक्षय हा रौडी आणि अजय हा सरदार आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी या तिघांसोबत काम करते आहे आणि त्यांच्यापासून मारपीट कशी करावी हे शिकले.या तिघांना पडद्यावर अॅक्शन फिल्म करताना तिला आनंद मिळतो. मला अॅक्शन फिल्म्स आवडतात. त्यांचा एक भाग म्हणूनही मला आनंद होतो. त्यांच्यामुळेच मी अॅक्शन फिल्म करु शकल्याने मी अगदी आनंदी आहे, आभारी आहे आणि कृतज्ञ आहे. अक्षयकुमारपासून काय टिप्स घेतल्या या प्रश्नावर सोनाक्षी म्हणाली, ‘सर्वात मोठी टिप म्हणजे असे चित्रपट करताना अपघातांपासून सावध राहणे. अजूनही मी ते फॉलो करु शकत नाही. परंतू तो खूप भावनात्मक व्यक्तीं आहे. योग्य प्रकारे समजून घेणे आणि मार्शल आर्ट शिकण्यासाठी त्याचा फायदा झाला.२९ वर्षीय सोनाक्षीने सर्व प्रकारचे अॅक्शन सीन्स या चित्रपटात केले आहेत. ज्यात फुलदाणी फेकणे, गुंडांना काठीने मारणे, बंदुका चालविणे त्याशिवाय लाथ मारणे, हाताने मारणे यांचा समावेश आहे.