सल्लूमियांचा अनोखा ‘जग घुमया’ अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 17:00 IST
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सुलतान’ चित्रपटाची सलमान खानचे चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. अजनू किमान एक महिना तरी त्यांना ...
सल्लूमियांचा अनोखा ‘जग घुमया’ अंदाज
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या ‘सुलतान’ चित्रपटाची सलमान खानचे चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. अजनू किमान एक महिना तरी त्यांना वाट पाहावी लागणार आहे.म्हणून मग ही बातमी तुम्हाला खूश करणार आहे. कारण चित्रपटातील ‘जग घुमया’ या गाण्यातील सलमानचा एक स्टील फोटो रिलिज करण्यात आला आहे.सुटा-बुटातील सलमान यामध्ये एकदम जंटलमन आणि हँडसम दिसत आहे. रोमॅण्टिक स्पॉट लाईटमध्ये माईकवर सूर छेडतानाचा ‘भाईजान’चा हा लूक त्यांच्या तमाम चाहत्यांना सुखावणारा आहे. राहत फतेह अली खान यांनी हे गाणे गायिले आहे.नुकतेच रिलिज करण्यात आलेले ‘बेबी को बसे पसंद है’ हे गाणं रसिकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यामुळे या गाण्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.