सल्लू-कतरिना पुन्हा एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 13:21 IST
सलमान खान आणि कतरिना कैफ हे दोघे एकत्र चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. ते ...
सल्लू-कतरिना पुन्हा एकत्र?
सलमान खान आणि कतरिना कैफ हे दोघे एकत्र चित्रपटात काम करणार असल्याच्या बातम्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत आहेत. ते दोघे राजकुमार संतोषी दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटात एकत्र झळकणार असून या चित्रपटाची निर्मिती सलमानची बहीण अल्विरा अग्निहोत्री करणार असल्याची चर्चा आहे. अल्विरा आणि कतरिना या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अलविराचे पती अतुल अग्निहोत्रीच्या बॉडीगार्ड या चित्रपटातही कतरिना एका गाण्यात दिसली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण या वर्षाअखेरीपर्यंत सुरू होणार असून हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.