Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानने काढली अरिजीतची समजूत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 09:41 IST

 गायक अरिजीत सिंगने ‘सुल्तान’ मधील ‘जग घुमैया’ हे गाणे गायले होते. पण, काही कारणास्तव नंतर अरिजीतने गायलेले हे गाणे ...

 गायक अरिजीत सिंगने ‘सुल्तान’ मधील ‘जग घुमैया’ हे गाणे गायले होते. पण, काही कारणास्तव नंतर अरिजीतने गायलेले हे गाणे काढून त्याजागेवर राहत फतेह अली खान यांनी गायलेले ‘जग घुमैया’ हे गाणे घेण्यात आले.त्याचबरोबर सलमाननेही हे गाणे त्याच्या आवाजात गायले आहे. पण, अरिजीतचे गाणे काढल्याने तो दुखावला. त्याला असे वाटले की, सलमानने त्याची वैयक्तिक नाराजी अरिजीतने गायलेले गाणे काढून व्यक्त केली का? सलमानने त्याचा गैरसमज दूर करत म्हटले,‘ प्रत्येक चित्रपटात अनेक गायकांची गाणी काढून टाकली जातात.गायक येतात आणि गातात. ते खरंतर दिग्दर्शक आणि निर्माते यांच्या पसंतीवर अवलंबून असते. मी देखील यात गायले आहे. पण माझाही आवाज नाकारण्यात आला. त्यांना वाईट वाटायला हवं होतं पण, ठीक आहे. यालाच आयुष्य म्हणतात.’ वेल सेड सलमान.