साजिद-करण येणार एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 10:11 IST
दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांचा २०१४ मधील ‘टू स्टेट्स’ चित्रपट आठवतो ना... अर्जुन आणि आलियाची अनोखी केमिस्ट्री मुळे चित्रपटाने प्रचंड ...
साजिद-करण येणार एकत्र!
दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांचा २०१४ मधील ‘टू स्टेट्स’ चित्रपट आठवतो ना... अर्जुन आणि आलियाची अनोखी केमिस्ट्री मुळे चित्रपटाने प्रचंड यश खेचून आणले. त्यानंतर अभिषेक वर्मनचा चित्रपट प्रदर्शित झालाच नाही.मात्र, आता तो एका चित्रपटाच्या थीमसह एकदम रेडी आहे. चित्रपटाची कथा फाळणीवर आधारित आहे. यात दोन अभिनेते मुख्य भूमिकेत असून करण जोहर आणि साजिद नादियाडवाला निर्मित चित्रपट असणार आहे.तिघेही पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. ‘टू स्टेट्स’ चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर केलेली कमाई रेकॉर्डब्रेक करण्याच्या उद्देशाने चित्रपटाकडे पाहिले जात आहे.