दिग्दर्शक मोहित सूरी यांचा 'सैय्यारा' ( Saiyaara Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. या चित्रपटात अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) मुख्य भूमिकेत आहेत. या दोघांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केले आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे तो 'ऑल टाइम ब्लॉकबस्टर' ठरला. सिनेमागृहांमध्ये यश मिळवल्यानंतर, आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहे.
ओटीटी प्ले प्रीमियर वेबसाइटच्या रिपोर्ट्सनुसार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सैय्यारा ऑनलाइन स्ट्रीम होईल. या चित्रपटाची ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल, तर आता तुम्ही घरबसल्या नेटफ्लिक्सवर या रोमँटिक थ्रिलरचा आनंद घेऊ शकता. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच नेटफ्लिक्सने याचे डिजिटल हक्क विकत घेतले होते, त्यामुळे मोठ्या पडद्यानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येईल हे आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे आता तुम्हाला फक्त काही दिवस वाट पाहावी लागेल.
बॉक्स ऑफिसवर 'सैय्यारा'चा विक्रमअहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या 'सैय्यारा'ने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने ३३५.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाचे कलेक्शन ५६८ कोटी रुपये राहिले आहे. या यशासोबतच, कोणत्याही नवोदित अभिनेत्यासाठी सर्वाधिक कमाई करणारा 'सैय्यारा' हा पहिला चित्रपट ठरला आहे.