२०२५ मधील 'सैयारा'(Saiyaara Movie )मधील सर्वात हिट लव्ह स्टोरी देणारे अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) नुकतेच मुंबईत एकत्र स्पॉट झाले. दोघेही एकत्र शॉपिंग करताना दिसले. यादरम्यान दोघांमधील एक अतिशय गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की अनीत पड्डा आणि अहान पांडे एकमेकांना डेट करत आहेत.
मोहित सूरीच्या 'सैयारा' या चित्रपटाने अहान आणि अनीतला रातोरात स्टार बनवले आणि अनेकांवर त्यांनी चांगलीच भुरळ घातली आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा अलीकडेच सिंगापूरला सेलिब्रेशन करण्यासाठी गेले होते आणि आता 'सैयारा' हिट झाल्यानंतर ते पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत. समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये, अहान आणि अनीत मुंबईतील एका मॉलमधील शोरूममधून बाहेर पडताना दिसत आहेत. दोघांनीही चेहऱ्यावर मास्क घातले होते आणि कोणीही त्यांना ओळखू नये म्हणून प्रयत्न करत होते. पण पापाराझींनी त्यांना पाहिले आणि त्यांना कॅमेऱ्यात कैद केले. जेव्हा दोघे मॉलमधून बाहेर पडत होते, तेव्हा अहानने अनीतचा हात धरण्याचा प्रयत्न केला, परंतु पापाराझींना पाहून अनिताने नकार दिला.
नेटकरी म्हणालेया व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत आणि चाहत्यांचं असं म्हणणं आहे की अनीत पड्डा आणि अहान पांडे एकमेकांना डेट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, ''त्याला अनीत पड्डाचा हात धरण्याची इच्छा होती.'' दुसऱ्याने म्हटले की, ''हे दोघे नक्कीच डेट करत आहेत.'' आणखी एकाने म्हटले की, ''आम्हाला या दोघांना पुन्हा पडद्यावर एकत्र पाहायचे आहे.'' दुसऱ्याने म्हटले की, ''ते या दशकातील सर्वोत्तम जोडपे आहेत.''
'सैयारा'नं किती केली कमाई?'सैयारा'च्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, या चित्रपटाने २१ दिवसांत देशभरात ३०८.४५ कोटी रुपये कमवले आहेत आणि अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. त्याच वेळी, त्याने जगभरात ५०८.२५ कोटींचा व्यवसाय केलाय.