Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सैफच्या अंगठ्याला दुखापत, किरकोळ सर्जरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 16:59 IST

सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर सैफला मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी ...

सैफ अली खान शूटींगदरम्यान जखमी झाला आहे. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. अंगठ्याला दुखापत झाल्यानंतर सैफला मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात भरती करण्यात आले. याठिकाणी त्याची किरकोळ सर्जरी झाली. उद्या वा परवा सैफला रूग्णालयातून सुटी मिळेल. सैफची बहिण सोहा हिने सैफ ठिक असल्याचे सांगितले. सैफ ठिक आहे. त्याच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली होती. पण आता तो ठीक आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, असे सोहा म्हणाली. सैफने अलीकडे ‘रंगून’चे शूटींग पूर्ण केले. आता तो अक्षत वर्मा दिग्दर्शित स्वत:च्या होम प्रॉडक्शनच्या चित्रपटात बिझी आहे. यापूर्वी विशाल भारद्वाज यांच्या ‘रंगून’ चित्रपटाच्या शूटींगदरम्यानही सैफच्या हाताला इजा झाली होती. त्यापूर्वी ‘एजंट विनोद’च्या एका अ‍ॅक्शन दृश्याच्या शूटींगदरम्यानही तो जखमी झाला होता.करिना कपूर सैफला भेटायला रूग्णालयात पोहोचली. सैफसोबत काही वेळ घालवल्यानंतर रूग्णालयाबाहेर पडताना करिनाचा हा फोटो..