‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवादच्या जागी सैफ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:20 IST
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची भूमिका असल्याने अडचणीत सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवाद खानने साकारलेली भूमिका सैफ अली खान ...
‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवादच्या जागी सैफ!
पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची भूमिका असल्याने अडचणीत सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये फवाद खानने साकारलेली भूमिका सैफ अली खान करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची बातमी एका आघाडीच्या वृत्तपत्राने दिली आहे. पाकिस्तानी कलावंतानी बॉलिवूडमध्ये काम करू नये यावरचा वाद फारच विकोपाला गेला असल्याचे यावरून दिसते. धर्मा प्रोडक्शनचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट 28 आॅक्टोंबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे चित्रपटाला मोठा फटका बसू शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे. यामुळेच दिग्दर्शक करण जोहर याला फवादने साकारलेली भूमिका सैफने करावी असे वाटू लागले आहे.यामुळे आतापर्यंत ट्रेलरमध्ये व या चित्रपटाच्या गाण्यात दिसलेला फवादचा चेहरा चित्रपटातून गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र रिलीजला केवळ काही दिवस उरले असताना हे कसे शक्य होणार याचाही विचार सुरू आहे. यासाठी ग्राफिक्सची मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येते. यात यश मिळाले नाही तर नव्याने काही सिन्स शूट करावे लागणार असून यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जाऊ शकते. फवाद खान याने आपण मागील जुैले महिन्यापासून पाकिस्तानात असल्याचे फेसबुक पोस्ट करून सांगितले होते. भारतातील वातावरण पाहता तो पुन्हा भारतात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी उत्सुक असेल वाटत नाही. दुसरीकडे शाहरुखच्या रईसमध्ये माहिरा खान हिची महत्त्वाची भूमिका आहे. शाहरुखचा मित्र करणने जर फवादला रिप्लेस केले तर शाहरुखही तसाच विचार करू शकतो.