Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ एक महिन्याच्या पालकत्व रजेवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 11:32 IST

करिना कपूर खान ही  मुलगा तैमूर अली खानसह घरी केव्हा येणार? अशी उत्सुकता खान आणि कपूर कुटुंबियांना लागलेली असतानाच ...

करिना कपूर खान ही  मुलगा तैमूर अली खानसह घरी केव्हा येणार? अशी उत्सुकता खान आणि कपूर कुटुंबियांना लागलेली असतानाच सैफ अली खानने मुंबईच्या ब्रीच क्रँडी रूग्णालयात जाऊन पत्नी करिना आणि मुलगा तैमूरला सुखरूप घरी आणले. तैमूरचे घरी आगमन झाल्यानंतर खान कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाळ तैमूर घरी आल्यावर सैफला आता त्याला सोडून बाहेर जाणे नकोसे होऊ लागले. म्हणून त्याने शूटिंगपासून सुट्टी आणि जास्तीत जास्त वेळ पत्नी करिना आणि तैमूरसोबत वेळ घालवण्यासाठी एक महिन्याची पालकत्व रजाच घेतली आहे. सैफ अली खानचा तैमूर हा तिसरा मुलगा. त्याची पहिली पत्नी अमृता सिंगपासून त्याला सारा आणि इब्राहीम ही दोन मुलं आहेत. मात्र, सैफ सध्या प्रचंड आनंदात आहे. बाळ  तैमूर घरी आल्यापासून त्याच्यासाठी काय करू आणि काय नको असे सैफला वाटते आहे. त्याच्या वांद्रे येथील घरी तो करिना आणि तैमूरसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणार आहे, असे त्याने जाहीर केले आहे. मात्र, जानेवारी मध्यापासून तो पुन्हा त्याच्या कामात बिझी होणार आहे. हॉलिवूड चित्रपट ‘शेफ’ याच्या हिंदी रिमेकसाठी त्याला शूटिंग सुरू करायची आहे. पण, तोपर्यंत जास्तीत जास्त वेळ आपण तैमूरसोबत घालवावा, एवढीच त्याची  इच्छा आहे. ‘शेफ’ चा हिंदी रिमेक बनवण्यासाठी उत्सुक असलेले दिग्दर्शक राजा कृष्णा मेनन यांनी सांगितले की,‘माझ्या चित्रपटामधील शेफ त्याच्या ट्रकसह भारतभर फिरत राहतो. आता आम्ही इंटरनॅशनल शेड्यूल देखील निश्चित केले आहे. हे शूटिंग फेब्रुवारीच्या मध्यंतरापर्यंत संपणार असून केरळ, गोवा, दिल्ली आणि अमृतसर येथील शूटिंग पूर्ण झाले आहे. अजून चित्रपटाचा क्लायमॅक्स आम्हाला शूट करावयाचा आहे. यूएस आणि युरोपमध्ये मला हे दोन महत्त्वाचे टप्पे शूट करायवयाचे आहेत.’सैफ अली खान चित्रपटासाठी  केव्हा वेळ देणार? यावर चित्रपटाचे येथून पुढील शूटींग अवलंबून आहे. आता तैमूर घरी आला म्हटल्यावर सैफचा पाय काही घरातून निघणारच नाही. पाहूयात, सैफ केव्हा त्याच्या आगामी चित्रपटासाठी वेळ काढतो ते!!