Join us

​सैफिनाचा खुलासा : sex determination testची बातमी धादांत खोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2016 20:00 IST

सैफ अली खान आणि करिना कपूर यांना मुलगाच होणार, अशी बातमी आली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. करिनाने लंडनमध्ये गर्भलिंग ...

सैफ अली खान आणि करिना कपूर यांना मुलगाच होणार, अशी बातमी आली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. करिनाने लंडनमध्ये गर्भलिंग परीक्षण चाचणी केल्याचा दावा या बातमीत केला गेला. भारतात गर्भलिंग परीक्षण चाचणीस बंदी आहे. पण विदेशात असा काहीही नियम नाही. त्यामुळेच या बातमीवर सगळ्यांचाच विश्वास बसला. पण आता करिनाने मात्र ही बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. करिनाच्या प्रवक्त्याने काही वेळापूर्वी एक निवेदन जारी केले. यात निवेदनात करिनाने लंडनमध्ये गर्भलिंग परीक्षण चाचणी केल्याचा आरोप खोडून काढला आहे. ही बातमी पूर्णत: निराधार आहे. सैफ आणि करिना दोघेही या बातमीचा इन्कार करतात. लंडनमध्ये करिनाने अशी कुठलीही चाचणी केलेली नाही. कुणाच्यातरी कल्पनतेून ही बातमी प्रकटली आहे. करिना आणि सैफ दोघेही संमजस नागरिक आहेत आणि अशा गोष्टींना त्यांचा विरोध आहे. एका खासगी मुद्याला अतिरंजक स्वरूप देणे टाळावे, अशी आमची इच्छा आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.वाचा, करिनाच्या प्रवक्त्याने जारी केलेले निवेदन जसेच्या तसे...The report is completely baseless and the couple strongly denies any such incident. There was no such discussion with any doctor in London and the report is purely a figment of someone’s imagination. Kareena and Saif are both mature adults and are above all this. We would like to request everyone not to unnecessary sensationalise a private issue.