Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफला पाकी कलाकारांचा पुळका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 14:50 IST

उरी येथील अतिरेकी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारताबाहेर हाकला, या मनसेच्या मागणीनंतर या मुद्यावर बॉलिवूडमध्ये ...

उरी येथील अतिरेकी हल्ल्यानंतर बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारताबाहेर हाकला, या मनसेच्या मागणीनंतर या मुद्यावर बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच अभिनेता सैफ अली खान यालाही पाकिस्तानी कलाकारांना पुळका आल्याचे दिसत आहे. सैफच्या मते, भारतात कुणी यावे आणि कुणी येऊ नये, हा निर्णय घेणे सरकारचे काम आहे आणि सरकारनेच हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. बॉलिवूडचे दरवाजे संपूर्ण जगासाठी खुले आहेत. पाकिस्तानसह संपूर्ण जगातील प्रतिभेचे बॉलिवूडने कायम स्वागत केले आहे. याहीवेळी तेच अपेक्षित आहे.