Join us
Daily Top 2Weekly Top 5

करीनाच्या आधी या मॉडेलसोबत सैफ होता रिलेशनशीपमध्ये, अमृता सिंगसोबतच्या घटस्फोटासाठी हीच कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 12:50 IST

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट करीना कपूरमुळे झाला नव्हता.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान फक्त चित्रपटांमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला आहे. त्याने वयाच्या १२ वर्षे मोठी अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. त्यावेळी सैफ अली खान फक्त २० वर्षांचा होता. मात्र सैफ अली खान आणि अमृता सिंगचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही आणि दोघांनी लग्नाला १३ वर्षे झाल्यानंतर २००४ साली घटस्फोट घेतला. सैफ आणि अमृताला दोन मुले आहेत सारा आणि इब्राहिम. हे दोघे आपल्या आईसोबत राहतात. अमृता आणि सैफच्या घटस्फोटासाठी करीना कपूर नाही तर इटालियन मॉडेल जबाबदार असल्याचे बोलले जाते. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंग आणि सैफ अली खानचे लग्न तुटण्यामागे सर्वात मोठे कारण रोजासोबत सैफचे असलेले एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जबाबदार असल्याचे बोलले जात होते. २००४ साली सैफ आणि रोजाची भेट केन्या येथे झाली होती. सैफचे विवाहित जीवन त्यावेळी खूप नाजूक परिस्थितीतून जात होते. त्यावेळी सैफ आणि अमृतामध्ये खूप भांडणे होत होती. रोजाला भेटल्यानंतर सैफचे तिच्यावर प्रेम जडले होते.

सैफ आणि रोजाच्या अफेअरचे अमृता सिंगपासून जास्त काळ लपल्या नाहीत. सैफ आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर अमृताला त्याच्यासोबत राहणे मंजूर नव्हते. तर सैफला रोजामुळे अमृतापासून वेगळे व्हायचे होते. २००४ साली ते दोघे विभक्त झाले. त्यानंतर रोजा सैफसाठी केन्या सोडून मुंबईत आली. सैफने रोजाला देखील फसविले होते. जे तिला मुंबईला आल्यावर समजले.

एका मुलाखतीत रोजा म्हणाली होती की सैफने तिच्यापासून पहिले लग्न आणि मुलांबद्दल सांगितले नव्हते. रोजाला सैफचे लग्न, मुले आणि घटस्फोटाबद्दल भारतात आल्यानंतर समजले होते. दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले होते. त्यावेळी सारा १० वर्षांची होती आणि इब्राहिम ४ वर्षांचा होता.

२००४ साली अमृताला घटस्फोट दिल्यानंतर सैफने २०१२ साली करीना कपूरसोबत लग्न केल होते.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान अमृता सिंग