Join us

​सैफ नाही, सलमान बनणार ‘बॅड बॉय’??

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 19:33 IST

सलमान खान पडद्यावर ‘विलेन’ बनण्यास कदाचित तयार आहे. कारण दोन मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने यासंदर्भात सलमानसोबत चर्चा चालवली असल्याची खबर ...

सलमान खान पडद्यावर ‘विलेन’ बनण्यास कदाचित तयार आहे. कारण दोन मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने यासंदर्भात सलमानसोबत चर्चा चालवली असल्याची खबर आहे. विशेष म्हणजे, ही खबर आश्चर्याचा धक्का देणारी आहे. होय, ‘रेस’च्या नव्या सीरिजमध्ये सलमान खान हा सैफ अली खानला रिप्लेस करणार असल्याची चर्चा आहे. ‘रेस’च्या दोन्ही सीरिजमध्ये सैफ होता. पण आता कदाचित तिसºया सीरिजमध्ये सलमान असण्याची दाट शक्यता आहे. असे झालेच तर सलमान पडद्यावर ‘विलेन’ बनण्यास राजी आहे, असेच म्हणायला हवे. कारण ‘रेस’च्या दोन्ही सिक्वलमध्ये सैफ निगेटीव्ह रोलमध्ये दिसला होता. सलमानने ‘रेस3’ची स्क्रिप्ट वाचली आणि त्याला ती आवडली असल्याने सलमान ‘बॅड बॉय’ बनणार, ही शक्यता वाढली आहे. ‘धूम4’मध्येही सलमान निगेटीव्ह रोल साकारणार असल्याची चर्चा आहे. यातील कुठली चर्चा खरी ठरते, ते येत्या काही दिवसांत दिसेलच. तूर्तास तरी सलमान ‘ट्युबलाईट’मध्ये बिझी आहे. सो, वेट अ‍ॅण्ड वॉच!!