सैफने बदलले ‘बेबो’ चे आयुष्य !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 10:51 IST
करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक मानली जाते. गुंजन जैन यांच्या ...
सैफने बदलले ‘बेबो’ चे आयुष्य !
करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोड्यांपैकी एक मानली जाते. गुंजन जैन यांच्या पुस्तकामध्ये एक मुलाखत प्रकाशित झाली आहे. ज्यात करण जोहर म्हणतो,‘ सैफने करिना कपूरला एक माणूस म्हणून पूर्णपणे बदलवून टाकले आहे. त्याने तिचे आयुष्य यासाठी बदलले आहे की, ज्यामुळे तिला तिचे आयुष्य तिच्या पद्धतीने जगता यावे.तिचा शिक्षक असल्याप्रमाणे त्याने तिला अनेक गोष्टी शिकवल्या. ट्रॅव्हलिंग, साहीत्य यासारख्या गोष्टींशी तिला फॅमिलियर करून दिले. सैफला वाटते की, बेबो जशी आहे तशीच रहावी. कारण त्याला अशीच बेबो आवडते.’सध्या करण जोहर ‘ऐ दिल हैं मुश्किल ’ शूटींगमध्ये व्यस्त आहे. करिना आगामी चित्रपट ‘वीरें दी वेडिंग’ मध्ये दिसणार आहे. सैफ मात्र ‘रंगून’ मध्ये दिसणार आहे.