सैफची लेक सारा अली खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 17:57 IST
‘केदारनाथ’च्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पण का? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!
सैफची लेक सारा अली खानचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल; पण का?
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान सध्या तिच्या आगामी ‘केदारनाथ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र सध्या ती तिच्या एका व्हिडीओमुळे लाइमलाइटमध्ये आली असून, तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सारा अतिशय हटके अंदाजात दिसत असून, तिचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करणारा आहे. होय, व्हिडीओमध्ये सारा जिममध्ये एक्सरसाइज करीत असून, त्यात तिचा लूक बघण्यासारखा आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने, ती तिचा फिगर मेंटेण्ड ठेवण्यासाठी किती मेहनत घेत आहे हेदेखील यावरून स्पष्ट होत आहे. व्हिडीओमध्ये सारा निळ्या रंगाच्या शॉट आणि पांढºया रंगाच्या टी-शर्टमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. ट्रेनरकडून सांगितल्या जाणाºया प्रत्येक टीप्स ती फॉलो करीत आहे. साराची ही मेहनत बघून अभिनेत्री होण्यासाठी काय-काय करावे लागते याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. सारा आगामी ‘केदारनाथ’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. तिच्या या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. खरं तर सारा बॉलिवूडमध्ये केव्हा पदार्पण करणार, असा प्रश्न सातत्याने तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता. आता ती ‘केदारनाथ’ची शूटिंग करीत असल्याने तिचा हा चित्रपट केव्हा रिलीज होणार याची आता प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, ‘केदारनाथ’चे दिग्दर्शन अभिषेक करीत आहेत, तर सारासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपुत प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट २०१३ मध्ये ‘केदारनाथ’मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. चित्रपटात सुशांत आणि साराची लव्हस्टोरी दाखविली जाणार आहे. हा चित्रपट जून २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल सारादेखील प्रचंड उत्सुक असल्याचे दिसून येते. शिवाय पापा सैफ आणि मम्मी अमृता यांनादेखील आपल्या लाडकीचा अभिनय बघण्याची आतुरता लागली आहे.