Join us

सैफची लेक सारा अली खानचा दिसला ग्लॅमर लूक, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 17:44 IST

अभिनेत्री अमृता सिंगची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पाऊल ठेवणार आहे. अद्यापपर्यंत ...

अभिनेत्री अमृता सिंगची मुलगी सारा अली खान लवकरच बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पाऊल ठेवणार आहे. अद्यापपर्यंत या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित झाली नसली तरी, सारावर त्याचा कुठल्याही प्रकारचा ट्रेस दिसून येत नाही. नुकतीच ती मुंबईतील एका रेस्टॉरंट बाहेर बघावयास मिळाली. गुलाबी रंगाचा सेटीन क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्समध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. गेल्या आठवड्यात जेव्हा सारा अली खान एका पार्लरबाहेर स्पॉट झाली होती, तेव्हा तिने फोटोग्राफर्सला बघून आपला चेहरा लपविला होता. मात्र यावेळेस ती फोटोग्राफर्सला बिंधास्तपणे पोझ देताना बघावयास मिळाली. यावेळी सारा कम्फर्टेबल दिसून आली. ccसाराच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास, तिने चित्रपटाच्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. मात्र चित्रपटाच्या रिलीज डेटवरून सध्या निर्माता आणि दिग्दर्शकांमध्ये वाद सुरू असल्याने पुढच्या भागाचे शूटिंग रखडले आहे. वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माता प्रेरणा चोपडा यांच्यात रिलीज डेटवरून चांगलाच वाद सुरू आहे. ज्यामुळे कलाकारांना शूटिंगमधून काहीकाळ सवड मिळाली आहे. शिवाय हा चित्रपट नेमका केव्हा रिलीज होईल हे जाणून घेण्याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक कपूर साराचा डेब्यू चित्रपट शाहरूख खानच्या ‘झिरो’ या चित्रपटासोबत रिलीज करू इच्छित आहेत. परंतु निर्माता प्रेरण अरोराला हा निर्णय खूपच घाईचा वाटत आहे. सध्या याच कारणावरून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आता जोपर्यंत या दोघांमध्ये निर्णय होत नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या दुसºया भागाच्या शूटिंगला सुरुवात होणार नाही असेच काहीसे दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटात सारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले असून, त्यास चांगली पसंती मिळत आहे.