Join us

Video: लाल फेटा, घोडागाडी अन् शाही थाट! सैफ अली खानचा मुंबईच्या रस्त्यांवर नवाबी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 16:01 IST

सैफ अली खान मुंबईच्या रस्त्यांवर खास नवाबी अंदाजात दिसला. सैफचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय

'दिल चाहता है', 'हम तुम', 'कल हो ना हो' ते आताच्या 'विक्रम वेधा' पर्यंत सैफ अली खानने कायमच विविध भूमिका साकारुन लोकांच्या मनात अभिनेता म्हणून स्वतःचं स्थान निर्माण केलं. सैफ नवाबी घराण्याचा वारसा पुढे चालवतोय हे आपल्या सगळ्यांना माहितंय. वडील नवाब मन्सुर अली खान पतौडींचा शाही वारसा सैफ पुढे चालवत असून सैफचं घर अर्थात 'पतौडी पॅलेस' किती लोकप्रिय आहे, हे आपल्याला माहितच आहे. अशातच सैफ आज शाही अंदाजात मुंबईच्या रस्त्यांवर दिसला. 

सैफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सैफने क्रीम रंगाचा कोट, मरुन पगडी परिधान केली होती. सैफ घोडागाडीत बसलेला दिसला. त्याच्यामागे दोन घोड्यांवर त्याची सुरक्षा करणारी दोन माणसं दिसली. सैफ अगदी आनंदात घोडागाडीवर स्वार झालेला दिसला. क्षणभर कॅमेराकडे नजर जाताच तो खास हसला. सैफचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. 

सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो शेवटी 'विक्रम वेधा' सिनेमात झळकला. याशिवाय सैफ ज्यु. एनटीआरसोबत 'देवरा पार्ट १' या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे. सैफ काही दिवसांपुर्वी अनंत अंबानींच्या प्री वेडींग पार्टीत सहकुटुंब दिसला. यावेळी त्याची पत्नी करिना कपूर आणि मुलं जेह आणि तैमूर दिसले. सैफच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरतैमुरअनंत अंबानी