Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानचा हा बोल्ड अंदाज पाहून तुम्हीही व्हाल क्लीन बोल्ड !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 08:00 IST

केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे.

गेल्या काही महिन्यापासून स्टार किड्सनी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावल्याचे  पाहायला मिळत आहेत. त्यात काही स्टार किडस सिनेमात झळकत त्यांनी स्वतःला सिद्धही केले आहे. आता आणखी काही स्टार किडस यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये सुरु आहे. चंकी पांडेची लेक अनन्या, सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी,शाहरूखची लेक सुहाना खान आणि आर्यन खान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरनंतर तिची बहिण खुशी कपूर ही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर छोटे नवाब अभिनेता सैफ अली खानची लेक सारा अली खाननेही जान्हवी प्रमाणे बॉलिवूड पदार्पण केले आहे.'केदारनाथ' या सिनेमासह आणखी काही सिनेमा तिने साईन केले आहेत.बॉलीवुडमध्ये गॉडफादर अशी ओळख असलेला करण जोहर सध्या सारा अली खानवर भलताच फिदा आहे. केजो सारा आणि हृतिकला एकत्र घेऊन सिनेमा करण्याच्या विचारात आहे. याशिवाय बॉलीवुडचा बादशाह आणि रोमान्स किंग शाहरुख खानचा लेक आर्यन खान आणि सारा या दोघांना एकत्र घेऊन सिनेमा करण्याचीही केजोची इच्छा आहे. त्यामुळे साराचं हिंदी चित्रपटसृष्टीतील भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटल्यास वावगं ठरु नये. इंडस्ट्रीत पदार्पणापूर्वीच तिला सिनेमाची लॉटरी लागली आहे. 

मात्र साराचा रूपेरी पडद्यावरील अंदाज पाहण्यापूर्वीच  ती सा-यांची फेव्हरेट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.नुकतंच साराचा एक ग्लॅमरस फोटो समोर आला आहे. साराचा हा अंदाज भलताच हॉट आणि तितकाच  ग्लॅमरस आहे.या फोटोतील तिच्या घायाळ करणा-या मादक अदा कुणालाही क्लीन बोल्ड करतील अशाच असल्याचे पाहायला मिळत आहे.सारा ही छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पहिली पत्नी अमृता सिंह यांची लेक आहे. सारानं न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.

सारा प्रमाणेच बी-टाऊन असो किंवा मग सोशल मीडिया प्रत्येक ठिकाणी स्टार किड्सची जोरदार चर्चा ऐकायला मिळते. आपल्या पालकांपेक्षा हम भी कुछ कम नहीं असं दाखवून देणारे अनेक स्टार किड्स सध्या चर्चेत आहेत. 

टॅग्स :सारा अली खानकरण जोहरसैफ अली खान