Join us

पदार्पणाआधीच सैफ अली खानच्या लेकाच्या हाती लागला दुसरा प्रोजेक्ट, 'सरजमीं'नंतर दिसणार 'दिलेर'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 19:21 IST

Ibrahim Ali Khan :सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान लवकरच 'सरजमीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान लवकरच 'सरजमीन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो काजोल आणि साऊथ स्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आता इब्राहिमचा पहिला चित्रपट रिलीज झाला नसतानाही त्याला दुसरा सिनेमा मिळाला आहे. 

आई-वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिमही अभिनयाकडे वळल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. करण जोहरची निर्मिती असलेला 'सरजमीं' हा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच इब्राहिमला दुसरा चित्रपटही मिळाल्याची माहिती मिळाली आहे. दिनेश विजान यांची निर्मिती असलेल्या रोमँटिक ड्रामामध्ये इब्राहिमची वर्णी लागली आहे. तूर्तास या चित्रपटाचं टायटल 'दिलेर' असं ठेवण्यात आलं असून, कुणाल देशमुख यांच्याकडे दिग्दर्शकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबतची इब्राहिमसोबतची बोलणी अखेरच्या टप्प्यात असून, अद्याप त्याची नायिका फायनल व्हायची आहे. 

रिपोर्टनुसार, 'दिलर'चे शूटिंग डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार आहे. त्याचे बहुतांश भाग लंडनमध्ये शूट केले जाणार आहेत. सध्या तरी या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीची निवड झालेली नाही. 'दिलर'चे शूटिंग सुरू करण्यापूर्वी इब्राहिम 'सरजमीन'चे प्रलंबित शेड्यूल पूर्ण करणार आहे. बोमन इराणी यांचा मुलगा कयोज इराणी दिग्दर्शित या चित्रपटात इब्राहिम मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :इब्राहिम अली खानसैफ अली खान सारा अली खानअमृता सिंग