Join us
Daily Top 2Weekly Top 5

अस्सा नवरा सुरेख बाई! प्रेग्नंंसी दरम्यान सैफ अली खान अशी घेतोय करिनाची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 11:05 IST

करीना कपूर खानने कोरोनाच्या काळात काम करण्याबद्दल सांगितले की, सर्व सुरक्षेसोबत काम करणे चुकीचे नाही. प्रेग्नेंसी कोणता आजार नाही आणि मी ही गोष्ट मानते की कठीण काळात आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. सध्या करिना प्रेग्नंट आहे. या दरम्यान ती विश्रांती न घेता कामात बिझी असल्याचे पाहायला मिळते. मात्र कामावेळी ती स्वतःकडे दुर्लक्ष होवू देत नाही. शूटिंगवेळी सेटवरील सर्वच बेबोची काळजी घेतना दिसतात.

अशात सैफदेखील तिला काही त्रास होत नाही ना याची काळजी घेत असतो. खरंतर दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. सैफ करिनाची किती काळजी घेतो, हेही कुणापासून लपून राहिलेले नाही. त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. दोघेही एकत्र मीडियाच्या कॅमे-यात कैद झाले. यावेळी गाडीचा दरबाजा खोलताना सैफ दिसत आहे.  

करीना आणि सैफने एक सोशल मीडियावर ऑगस्ट महिन्यात ते दोघे पुन्हा आई-बाबा होत असल्याचे सांगितले होते. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होतो आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असे सैफ व करीनाने म्हटले होते. दोघेही बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

नुकतेच करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितले की प्रेग्नेंसीदरम्यान काम करणे अयोग्य नाही. तिने हेदेखील सांगितले की, तिच्या कुटुंबाने तिला घरी रहायला सांगितले आहे पण तरीदेखील तिला काम करणे गरजेचे वाटते कारण तिला तिचे कमिटमेंट्स पूर्ण करायचे होते.

करीना कपूर खानने कोरोनाच्या काळात काम करण्याबद्दल सांगितले की, सर्व सुरक्षेसोबत काम करणे चुकीचे नाही. प्रेग्नेंसी कोणता आजार नाही आणि मी ही गोष्ट मानते की कठीण काळात आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.

 

अशा परिस्थितीत काम करू शकत नाही, अशी कारणे देऊन मी गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. मी तशी नाही. हो, माझे पालक आणि इतर लोकांनी मला घरी रहायला सांगितले आहे पण मी घरी बसू शकत नाही. मला काम करायला आवडते. 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूर