Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खान 'या' नावाने सुरू करणार स्वतःचे प्रोडक्शन हाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 12:48 IST

सैफ अली खान 'ब्लॅक नाईट फिल्म्स' या नावाने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरू करणार आहे. इतकेच नाही तर त्याने प्रोडक्शन हाऊसअंतर्गत पहिल्या सिनेमाबद्दल विचारही केला आहे.

ठळक मुद्देसैफ अली खान सुरू करणार स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सैफ ब्लॅक नाईट फिल्म्स या नावाने सुरू करणार प्रोडक्शन हाऊस

सैफ अली खानने जवळपास नऊ वर्षांपूर्वी दिनेश विजयनसोबत इलुमिनाटी प्रोडक्शन हाऊसची सुरुवात केली होती. सैफ आणि दिनेशने मिळून 'लव आज कल', 'कॉकटेल' व 'गो गोवा गॉन' यांसारख्या चित्रपटाची निर्मिती केली. त्या दोघांनी शेवटचा 'हॅप्पी एडिंग' या सिनेमाची निर्मिती केली होती. त्यानंतर सैफ व दिनेश वेगळे झाले व दिनेशने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. आता सूत्रांकडून माहिती मिळते आहे की सैफ अली खानदेखील स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहे. 

सैफ ब्लॅक नाईट फिल्म्स या नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहे आणि त्याने या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत कोणत्या चित्रपटाची निर्मिती करायचे हे देखील ठरवले आहे. हा सिनेमा फॅमिली कॉमेडी असेल. याचे दिग्दर्शन नितीन कक्कड करणार आहेत. या सिनेमाबाबत वृत्त आले होते की या चित्रपटात सैफसोबत सारा अली खान दिसणार आहे. मात्र आता निर्मात्यांकडून स्पष्ट समजते आहे की ते या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत. सैफ आपल्या प्रोडक्शन हाऊसची सुरूवात त्याचा चांगला मित्र जय शेवाक्रमानीसोबत करत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात सैफच्या प्रोडक्शन हाऊसचे काम सुरू होणार आहे. आता सैफ कोणत्या सिनेमाची निर्मिती करतो आणि त्यात कोण कलाकार असतील हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. 

टॅग्स :सैफ अली खान