Join us

सैफ अली खानला 15 वर्षांपूर्वी आला होता हृदयविकाराचा धक्का, अवॉर्ड मिळालं त्याच दिवशी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 16:04 IST

करीना कपूरशी लग्न करण्याच्या आधीची ही घटना आहे.

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानला (Saif Ali Khan) नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. फिल्म सेटवर झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यातून तो सुखरुप बाहेर आला असून लगेच त्याला डिस्चार्जही मिळाला आहे. १५ वर्षांपूर्वी सैफ हृदयविकाराच्या धक्क्यातूनही सावरला असल्याची माहिती आता व्हायरल होत आहे. करीना कपूरशी लग्न करण्याच्या आधीची ही घटना आहे. तेव्हा सैफ मृत्यूच्या दारातून परत आला होता. 

2007 साली सैफ अली खानला संध्याकाळच्या वेळी अचानक छातीत जोरात दुखायला लागलं होतं. अस्वस्थतेमुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी सैफला माईल्ड हार्टअॅटॅक येऊन गेल्याची माहिती दिली. तेव्हा त्याचं वय केवल 37 वर्ष होतं. 2006 साली त्याचा 'ओमकारा' सिनेमा रिलीज झाला होता. तर 2007 मध्ये या सिनेमातील त्याच्या 'लंगडा त्यागी'भूमिकेसाठी त्याला बेस्ट निगेटिव्ह कॅरेक्टरचा स्टारडस्ट अवॉर्ड मिळाला होता. ज्या दिवशी त्याला अवॉर्ड मिळाला त्याचदिवशी त्याला हृदयविकाराचा धक्का आला होता.

सैफला तेव्हा सिगरेट आणि दारुचं व्यसन होतं. या कारणाने त्याला मायोकार्डियल इन्फाकर्शन झाले होते अशी डॉक्टरांनी माहिती दिली होती. यानंतर त्याने सर्व वाईट सवयी सोडल्या. मृत्यूच्या दारातून परत येताच त्याने जीवनशैलीत चांगले बदल केले. यामुळेच तो वयाच्या 53 व्या वर्षीही एवढा फीट आहे. सध्या त्याची खांदा आणि गुडघ्याची सर्जरी झाली आहे. 

सैफ अली खान आगामी 'देवारा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर ज्युनिअर एनटीआर, जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत आहेत. 

टॅग्स :सैफ अली खान हृदयविकाराचा झटकाहॉस्पिटलकरिना कपूर