सैफ अली खानने सांगितले त्याच्या फिटनेसचे फंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 17:47 IST
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या फिटनेसता राज सांगितला आहे. सैफच्या फिटनेसमध्ये वॉकिंगला विशेष महत्त्व आहे. वॉकिंगला त्याला ताण-तणावासून ...
सैफ अली खानने सांगितले त्याच्या फिटनेसचे फंडे
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या फिटनेसता राज सांगितला आहे. सैफच्या फिटनेसमध्ये वॉकिंगला विशेष महत्त्व आहे. वॉकिंगला त्याला ताण-तणावासून दूर राहायला मदत करत असल्याचे सैफने सांगितले आहे. जेव्हा कधी सैफ तणावात असतो तेव्हा तो दूर पर्यंत पायी चालत जातो. वॉक घेणे ही संपूर्ण शरीरासाठी सगळ्यात उत्तम एक्ससाईज आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या रुटीनमध्ये चालण्याचा समावेश केला पाहिजे असे सैफचे मत आहे. काही दिवसांपासून पूर्वी सैफ वॉक घेत असताना मीडियाच्या कॅमेऱ्यात ही कैद झाला होता. सैफच्या मते एक्ससाईज करणे हे प्रत्येक व्यक्तिने आपल्या दैनदिन जीवनाचा हिस्सा बनवणे गरजेचे आहे. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात वॉक घेण्या इतकी एक्ससाइज दुसरी कोणतीच नसल्याचे ही सैफने सांगितले. चालणे हे फक्त तुम्हाला फिजिक्ली नाही तर मेंटली ही फिट ठेवते. सैफ म्हणाला मला जेव्हा जी तणाव येतो मी जॉगिंग शूज घालून, कानात हेडफोन घालत चांगल संगीत ऐकत दूर पर्यंत वॉकसाठी निघून जातो. सैफचा रंगून चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. याचित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना रणौतसोबत सैफ दिल्लीत झालेल्या एका हेल्थ इवेंटच्यावेळी वॉक करताना दिसला होता. रंगून मध्ये सैफ अली खान रुसी बिल्मोरिया ही भूमिका साकारत आहे. रुसी हा श्रीमंत असून त्याचे राहणीमान अगदी ब्रिटीशांसारखे आहे. इंग्रज जे भारतासाठी करीत आहे ते योग्य आहे असा त्याचा विश्वास आहे. त्याचा स्वभाव नाटकी, आक्रमक, तापट आहे. श्रीमंत असल्याने तो स्वत:ला शक्तीशाली समजतो. मात्र तो कंगनाच्या प्रेमात पडतो. प्रेम ठरवून होत नाही असे म्हणताना तो दिसतो आहे. रंगूनमध्ये सैफने साकरलेली रुसीची भूमिका करिना कपूरला अतिशय भावली आहे.