Join us

Video : सेल्फीच्या नादात चाहत्याने मारला धक्का! असा भडकला नवाब सैफ अली खान!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 20:08 IST

एका चाहत्याने अचानक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात सैफला धक्का मारला. मग मात्र सैफची सटकली. 

आपल्या आवडत्या स्टारसोबत फोटो घेणे कुण्या चाहत्याला आवडणार नाही. स्टार्सला बघताच, चाहते प्रचंड उत्साहित होतात. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तुटून पडतात. कधी कधी हे चाहते इतक्या जवळ जातात की स्टार्सही वैतागतात. असेचं काहीसे घडले ते अभिनेता सैफ अली खान याच्याबद्दल. होय, अगदी काही तासांपूर्वीची ही घटना.

काही तासांपूर्वी सैफ अली खान मुंबई एअरपोर्टवर दिसला. विमानतळावर उतरल्यानंतर तो मुख्य प्रवेशद्वाराकडे जात असताना काही चाहत्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि त्यांनी अचानक सैफला गराडा घातला. सगळ्यांमध्ये  सेल्फी घेण्याची चढाओढ लागली. सैफसाठी इथपर्यंत सगळे ठीक होते. पण एका चाहत्याने अचानक सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात सैफला धक्का मारला. मग मात्र सैफची सटकली. अर्थात तो काहीही बोलला नाही. पण धक्का मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या चाहत्याकडे त्याने असे काही बघितले की, चाहत्याची घाबरली.तूर्तास सैफ अली खान ‘नेटफिक्स’वरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. ही वेबसीरिज प्रचंड गाजली. इतकी की, याचा दुसरा पार्ट कधी येतो, असे प्रेक्षकांना झाले आहे. लवकरचं याचा दुसरा पार्टही येणार आहे.

 

टॅग्स :सैफ अली खान