बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आपल्या करिअरपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असतो. सैफ अली खानचा डेब्यू चित्रपट परंपरा रिलीज झाला नव्हता तेव्हाच त्याचे अभिनेत्री अमृता सिंगवर प्रेम जडले होते. दोघांची भेट एका फोटोशूटदरम्यान झाली होती आणि मग त्यांच्यात जवळीक वाढली होती. २० वर्षीय सैफ अली खानने ३२ वर्षीय अमृता सिंगला आपले लाइफ पार्टनर बनविले. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. दोघांनी १९९१ साली लग्न केले होते आणि २००४ साली ते वेगळे झाले.
लग्न तुटण्यामागे दोघांच्या वयातील अंतर कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. अमृता वयाने सैफपेक्षा मोठी असल्यामुळे त्यांचे जमत नव्हते आणि ते वेगळे झाले. त्यानंतर सैफ अली खानने स्वतःपेक्षा वयाने १२ वर्षे लहान करीना कपूरसोबत विवाह केला.
सैफ अली खान आणि करीना कपूरसोबत २०१२ साली लग्न केले होते. टशन चित्रपटाच्या शूटिंगवेळी त्यांच्यात जवळीक वाढली आणि बराच वेळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत.