Join us

सैफ अली खानने मुलगी साराला दिला अ‍ॅडव्हाइस; म्हटले मला नव्हे आमीर खानला कर फॉलो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2017 21:59 IST

सध्या बॉलिवूडमध्ये सारा अली खान हिच्या डेब्यूची चर्चा जोरात आहे. सूत्रानुसार साराला करण जोहरने त्याच्या आगामी ‘स्टुडंट आॅफ द ...

सध्या बॉलिवूडमध्ये सारा अली खान हिच्या डेब्यूची चर्चा जोरात आहे. सूत्रानुसार साराला करण जोहरने त्याच्या आगामी ‘स्टुडंट आॅफ द इअर-२’ची तिला आॅफर दिली होती. परंतु साराकडून अद्यापपर्यंत याबाबतचा खुलासा होऊ शकला नसल्याने ती या चित्रपटात झळकणार की नाही, याविषयी साशंकता आहे. असो, आता साराच्या डेब्यूचा खुलासा तिचे वडील सैफ अली खान याने केला असून, तिने बॉलिवूड करिअर करताना कोणाला फॉलो करावे असा मोलाचा सल्लाही तिला दिला आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या एका इव्हेंटमध्ये सैफने म्हटले की, तिने मला नव्हे तर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान याचा आदर्श घ्यायला हवा. पुढे बोलताना सैफ म्हणाला की, मी साराला कला (आर्ट) फॉलो करण्याचा सल्ला दिला होता; याचा अर्थ तिने मला फॉलो करावे असे नसून, मला असे वाटते की, तिने आमीरला फॉलो करायला हवे. कुठलेही काम करताना त्याच्यासारखा परफेक्ट विचार तिने करायला हवा. वास्तविक साराला लहानपणीच बॉलिवूडमध्ये काम करायचे होते. आता मी साराला फक्त गाइड करू शकतो. कारण ती स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम असून, मी तिच्यावर कुठलीही जबाबदारी थोपवू शकत नाही. काही दिवसांपूर्वीच साराची आई अमृता सिंग हिने साराच्या बिकिनी सीन्सवर आक्षेप घेतला होता. तिच्या मते, साराने तिच्या पहिल्याच चित्रपटात बोल्ड सीन्स देणे फारसे आवडणारे नसेल. त्यामुळेच तिने साराचे कान टोचताना फिल्ममेकर्सलाही स्पष्ट शब्दात नकार दिला होता. असो, सैफने साराच्या डेब्यूबरोबरच मुलगा इब्राहिम अली खान याच्या बॉलिवूड डेब्यूविषयी विचारलेल्या प्रश्नावरदेखील उत्तर दिले. इब्राहीम केवळ १६ वर्षांचा आहे. त्यामुळे सध्या तरी त्याचा बॉलिवूडमध्ये येण्याचा कुठलाच प्लॅन नाही. तो त्याच्या शिक्षणावर लक्ष देऊ इच्छितो. काही दिवसांपूर्वी साराने इन्स्टाग्रामवर रणवीर सिंगसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो बघून प्रत्येकाला असे वाटत होते की, सारा रणवीर सिंगसोबत बॉलिवूड डेब्यू करीत आहे; मात्र ही अफवा असल्याचेच अद्यापपर्यंत तरी स्पष्ट होते.