Join us

सैफ अली खान आणि करीना कपूरचा लाडका तैमूर बनला शेफ, बनवली उत्कृष्ट डिश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:05 IST

आता तैमूर मोठा भाऊ झाला आहे आणि हल्ली तो छोट्या भावाची खूप काळजी घेतो.

करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा लाडका लेक तैमूर अली खानला कुकीज बेक करायला खूप आवडते. नुकतेच त्याने त्याच्या कुटुंबासाठी कुकीज बेक केले आहेत. या फोटोत त्याने जे काही बेक केले आहे, त्याला त्याने स्वतःचे, लहान भाऊ, करीना आणि सैफ या प्रत्येकाचे आकार दिले आहेत.तैमूरने काहीही केले तरी त्यात त्याचा क्यूटनेस दिसून येतो. आता तैमूर मोठा भाऊ झाला आहे आणि हल्ली तो छोट्या भावाची खूप काळजी घेत असतो. 

करीना कपूरने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, माझी माणसं एका फ्रेममध्ये. या फोटोत तैमुर खूप क्यूट दिसतो आहे. करीनाच्या या पोस्टवर सर्व जण तैमूरच्या या टॅलेंटचे कौतुक करत आहेत. तैमूरने यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे, ज्यात तो खूप क्यूट दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी तैमूरची आई करीनासोबतचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो पापाराझींच्या कॅमेरावर ओरडला आणि धावताना समोरच्या दरवाज्याच्या काचेवर आदळला होता.

करिना कपूरने काही दिवसांपूर्वीच दुस-या मुलाला जन्म दिला. अद्याप करिनाच्या दुसऱ्या मुलाचा चेहरा चाहत्यांना दिसलेला नाही. महिला दिनी बेबोने मुलासोबतचा एक फोटोही पोस्ट केला होता. मात्र, यात मुलाचा चेहरा दिसत नव्हता. अद्याप सैफिनाने आपल्या बाळाच्या नावाबद्दलही माहिती दिलेली नाही.

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच ती ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात करीनाबरोबर आमिर खान मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय आता लवकरच ती कमबॅक करण्याची शक्यता आहे. सध्या ती स्क्रीप्ट फायनल करत असल्याचे समजते आहे. तर सैफ अली खान ‘भूत-पोलीस’ या चित्रपटात दिसणार असून, या चित्रपटात त्याच्यासोबत अर्जुन कपूर, यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस देखील झळकणार आहे.

टॅग्स :करिना कपूरतैमुरसैफ अली खान