सैफ अली खान आणि करिना कपूर पुन्हा एकत्र दिसणार स्क्रिनवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2017 17:32 IST
करिना कपूर खान आपला पती सैफ अली खान सैफ अली खानसोबत शेवटची मोठ्या पडद्यावर 2012मध्ये आलेल्या एजेंट विनोद चित्रपट ...
सैफ अली खान आणि करिना कपूर पुन्हा एकत्र दिसणार स्क्रिनवर
करिना कपूर खान आपला पती सैफ अली खान सैफ अली खानसोबत शेवटची मोठ्या पडद्यावर 2012मध्ये आलेल्या एजेंट विनोद चित्रपट झळकली होती. दोघांना मधील केमिस्ट्री प्रेक्षकांनी कुर्बान आणि टशनमध्ये बघितली आहे. यामध्येच सैफ आणि करिनाच्या फॅन्ससाठी एक खूशखबर येते आहे लवकरच सैफ आणि करिना पुन्हा एकदा स्क्रिनवर एकत्र झळकणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ब्राँडने सैफ आणि करिनाला अप्रोच केले आहे आणि यासाठी त्यांनी होकार ही दिला आहे. दोघे लवकरच या अॅडच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. करिनाच्या प्रेग्नेंसी दरम्यान करिना आणि सैफने एका मॅगझीनसाठी फोटो शूट केले होते. एकीकडे सैफचे कालाकांडी आणि शेफमध्ये चित्रपट रिलीज होणार आहे तर तिकडे करिना आपल्या बहु प्रतिक्षित चित्रपट वीरे दी वेडींगची शूटिंग सुरु करणार आहे.View pic :सात महिन्यांचा झाला तैमूर; मावशी करिष्मा कपूरने असे केले विश!! नुकताच सैफ आणि करिनाचा तैमूर अली खान 7 महिन्यांचा झाला आहे. यानिमित्त करण्यात आलेल्या सेलिब्रेशनचे फोटो मावशी करिश्मा कपूरने इंन्स्टाग्रामवर शेअर केले होते. स्टारकिड्सच्या यादीत तैमूरचे नाव सगळ्यात वर आहे. डिसेंबरमध्ये तैमूरचा पहिला वाढदिवस आहे. त्याच्या पहिल्या बर्थ डेच्या सेलिब्रेशनच्या प्लॉनिंगमध्ये करिना बिझी आहे. तैमूरच्या जन्मानंतर करिनाने ब्रेक घेतला होता. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी करिना जीममध्ये जाऊन वर्कआऊट करताना दिसते आहे. प्रेग्नेंसी आधीच करिनाने रिया कपूरचा वीरे दी वेडींग साइन केला होता मात्र प्रेग्नेंसीमुळे हा चित्रपट रखडला. अखेर या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरुवात होणार असल्याचे समजते आहे. यात करिनासह सोनम कपूर आणि स्वरा भास्कर ही झळकणार आहेत.