Join us
Daily Top 2Weekly Top 5

तैमूर बाहुला विसरा, आता घ्या ‘तैमूर कुकीज’चा स्वाद!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:25 IST

अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय?

ठळक मुद्दे तैमूरची मॉम करिना कपूर, पापा सैफ अली खान इतकेच काय तर आजी शर्मिला टागौर या सगळ्यांना तैमूरच्या वाढत्या लोकप्रियतेने चिंतेत टाकले आहे. या लोकप्रियतेने तैमूरचे बालपण हिरावले जाऊ नये, अशी चिंता त्यांना आहे.

सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. त्याचे हे फोटो वा-याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होतात. अर्थात अनेक लोक तैमूरला दिल्या जाणा-या अवास्तव प्रसिद्धीबद्दल टीकाही करतात. पण या टीकेची पर्वा कोण करतेय?गतवर्षी बाजारात आलेला तैमूर बाहुला तुम्हाला आठवत असेलच. केरळच्या एका मार्केटमध्ये तैमूरच्या चेहºयाचा बाहुला लोकप्रिय झाला होता. ताज्या बातमीनुसार, आता तैमूरच्या नावाची बिस्किटे मार्केटमध्ये लोकप्रिय झाली आहेत.

होय, डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, कस्टमाईज कुकीज बनवणाºया एका बेकरीत तैमूर कुकीजची धडाक्यात विक्री सुरु आहे. या बेकरीने नुकत्याच पार पडलेल्या एका अवार्ड फंक्शनमध्ये आलेल्या पाहुण्यांना हे तैमूर कुकीज भेट म्हणून दिलेत. आहे ना कमाल?

खरे तर तैमूरची मॉम करिना कपूर, पापा सैफ अली खान इतकेच काय तर आजी शर्मिला टागौर या सगळ्यांना तैमूरच्या वाढत्या लोकप्रियतेने चिंतेत टाकले आहे. या लोकप्रियतेने तैमूरचे बालपण हिरावले जाऊ नये, अशी चिंता त्यांना आहे. पण तैमूरची लोकप्रियता ‘कॅश’ करू इच्छिणाºयांना मात्र याची जराही चिंता नाही. मग ते तैमूरचे बाहुले बाजारात आणणारी कंपनी असो किंवा त्याचा चेहरा असलेली कुकीज विकणारी बेकरी असो. तैमूरची लोकप्रियता वाढतेय आणि ती ‘कॅश’ करण्याची चढाओढही वाढतेय.

टॅग्स :तैमुरसैफ अली खान करिना कपूर