Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ अली खान रुग्णालयात दाखल! नेमकं कारण काय? चाहते चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:01 IST

Saif Ali Khan : सैफ अली खानला काय झालं? उपचारासाठी रुग्णालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या बाबतीत एक मोठी माहिती समोर आली आहे. सैफ अली खानला आज सकाळी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याचे चाहते चिंतेत आहेत. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल का करण्यात आलं? याचं कारण समोर आलं आहे. 

दैनिक भास्करने दिलेल्या रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या गुडघ्यांवर आज शस्त्रक्रिया होणार आहे. त्याच्या गुडघ्यांमध्ये फ्रॅक्चर असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानच्या गुडघ्याला शूटिंग करताना दुखापत झाली की अन्य कोणत्या कारणामुळे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण, शस्त्रक्रियेसाठी त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सैफ अली खानबरोबर त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरही रुग्णालयात असल्याचं समजत आहे. 

याआधीही सैफला शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. २०१६ साली 'रंगून'च्या सेटवर सैफच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला लगेचच उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. 

टॅग्स :सैफ अली खान करिना कपूरसेलिब्रिटी