Join us

महेश मांजरेकरांची लेक सईनं घेतलं महाकालेश्वराचं दर्शन, नंदीच्या कानात सांगितली इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:59 IST

महेश मांजरेकरांची लेक सईनं महाकालेश्वराचं दर्शन घेतलं.

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर ही कायम चर्चेत असते. अभिनेता सलमान खानच्या 'दबंग' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसली होती. आज ती आघाडीची अभिनेत्री आहे. सईची अध्यात्मिक बाजू देखील खास आहे. ती कायम वेगेवगळ्या देव स्थांनाना भेट देताना दिसते. आताही ती उज्जैन येथील महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली. 

सई मांजरेकरनं उज्जैनमधील श्री महाकालेश्वर मंदिराला भेट देत दर्शन घेतलं. तिने सलवार सूटमध्ये बाबा महाकालची पूजा केली. तसेच तिने जय श्री महाकालच्या घोषणेसह नंदीजींच्या कानात आपली इच्छाही सांगितली. यादरम्यान सई बाबा महाकालच्या भक्तीत मग्न असल्याचे दिसून आलं. जय श्री महाकालच्या जपसोबतच तिने ओम नमः शिवायचा जपही केला.

मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सई म्हणाली, "इथे येऊन खूप छान वाटलं. बाबा महाकाल मला पुन्हा-पुन्हा बोलवत राहोत, अशीच माझी मनोकामना आहे. इथे आल्यावर मला शांती आणि खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली. या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज जेव्हा प्रत्यक्ष बाबा महाकालांचे दर्शन घेतले, तेव्हा मनाला वेगळीच अनुभूती झाली", या शब्दात तिनं भाव व्यक्त केला. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महाकालेश्वर आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते. दु:ख आणि संकटांवर विजय मिळवणाऱ्या भगवान शंकराचे भक्त जगभरातून येथे येतात.

सई मांजरेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'इंडिया हाउस' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राम चरण 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सई मांजरेकर अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रातही सक्रिय आहे. सईचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवालासोबत सईचे अफेअर असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :सई मांजरेकरमहेश मांजरेकर