Join us

वाह रे सई! इमरान हाश्मीसोबत दिसणार ताम्हणकरांची लेक, 'ग्राऊंड झिरो' बॉलिवूड सिनेमाचं पोस्टर समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:34 IST

सई 'ग्राऊंड झिरो' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती इमरान हाशमीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर तिने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. मराठीसोबत बॉलिवूडमध्येही सईने ठसा उमटवला आहे. आता ती नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुलकंद या सईच्या मराठी सिनेमाची चर्चा सुरू असताना अभिनेत्रीने तिच्या बॉलिवूड सिनेमाबाबत अपडेट दिली आहे. 

सई 'ग्राऊंड झिरो' या बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. 'ग्राऊंड झिरो' मध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो बीएसएफ जवान नरेंद्र दुबे यांची  भूमिका साकारताना दिसणार आहे. २००१ मध्ये दिल्लीतील संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सिक्रेट मिशनवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

या पोस्टरवर इमरान हाश्मी हातात रायफल घेऊन पाठमोरा उभा असल्याचं दिसत आहे. "तुझे लायी यहाँ तेरी मौरी फौजी, काश्मीर का बदला लेगा गाजी" असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. तेजस देओस्कर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या २५ एप्रिलला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सईच्या या नव्या सिनेमासाठी चाहतेही उत्सुक आहेत. 

सईचे बॉलिवूड सिनेमे

सईने २००८ साली मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं होतं. 'ब्लॅक अँड व्हाइट' या सिनेमात ती दिसली होती. त्यानंतर आमिर खानच्या 'गजनी'मध्येदेखील सई झळकली होती. 'वेक अप इंडिया', 'लव्ह सोनिया', 'अग्नी', 'भक्षक' या हिंदी सिनेमांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. तर 'मीमी' आणि 'हंटर' या सिनेमांतील भूमिकेने तिने लक्ष वेधून घेतलं. 

टॅग्स :सई ताम्हणकरइमरान हाश्मी