Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सागरिका घाटगे जहीरसोबतच्या नात्याविषयी पहिल्यांदाच बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 14:35 IST

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाडगे प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटानंतर तिने कोणताही हिट चित्रपट न दिल्याने ती तितकीशी ...

चक दे इंडिया या चित्रपटामुळे सागरिका घाडगे प्रसिद्धीझोतात आली. या चित्रपटानंतर तिने कोणताही हिट चित्रपट न दिल्याने ती तितकीशी चर्चेत राहिली नाही. पण सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. क्रिकेटर जहीर खानसोबत अनेक पार्ट्यांमध्ये तिला पाहायला मिळत आहे. त्यामुळे जहीर आणि सागरिका यांच्यात प्रेमप्रकरण असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नालादेखील सागरिकाने जहीरसोबत उपस्थिती लावली होती. एवढेच नव्हे तर लग्नात ते दोघे सतत एकत्र होते. त्यावेळी मीडियात आलेल्या त्यांच्या फोटोंचीदेखील खूप चर्चा झाली होती. चक दे इंडिया या चित्रपटात सागरिकाने एका हॉकी प्लेअरची भूमिका साकारली होती. ही हॉकी प्लेअर एका क्रिकेटरच्या प्रेमात असल्याचे चित्रपटात पाहायला मिळाले होते आणि खऱ्या आयुष्यातही आता ती एका क्रिकेटरच्याच प्रेमात पडली आहे. सागरिका आणि जहीर हे गेल्या सहा महिन्यांपासून नात्यात असल्याचे म्हटले जाते. जहीर आणि सागरिकाची ओळख काही कॉमन फ्रेंड्सच्या माध्यमातून झाली होती. सागरिका लवकरच इरादा या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आणि जहीरच्या नात्याबद्दल तिने प्रतिक्रिया दिली आहे. सागरिका सांगते, "सध्या मी माझ्या आयुष्यात खूप खूश आहे असे नक्कीच सांगेन. मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायला कधीच आवडत नाही. त्यामुळे मी याबद्दल कधीच मीडियाशी बोलली नाही. खरे तर मी नेहमीच मीडियापासून दूर राहाण्याचा प्रयत्न करते. माझे वैयक्तिक आयुष्य हा चर्चेचा विषय नाहीये. जहीरच्या खेळाचा मी खूप आदर करते. तसेच जहीर माझा इरादा हा चित्रपटदेखील पहाणार आहे." पण सागरिकाने यापेक्षा अधिक जहीर आणि तिच्या नात्याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला.