Join us

सैफीनाची डिनरडेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 11:22 IST

 सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे सध्या प्रचंड खुश आहेत. त्यांचा आई-बाबा होण्याचा आनंद त्यांना स्वस्थ बसू ...

 सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे सध्या प्रचंड खुश आहेत. त्यांचा आई-बाबा होण्याचा आनंद त्यांना स्वस्थ बसू देत नाहीये. नुकतेच ते दोघे डिनरडेटसाठी गेले होते. तेव्हा दोघेही अत्यंत खुश आणि समाधानी दिसत होते.सैफ एखाद्या जबाबदार पतीप्रमाणे  करिनाचा हात हातात घेऊन तिची काळजी घेत होता. तर करिना देखील त्याला उत्तमप्रकारे साथ देत आहे. डिसेंबरमध्ये ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे.सैफ लवकरच आता शाहिद कपूर आणि कंगणा राणौत सोबत ‘रंगून’ मध्ये दिसणार आहे. तसेच करिनाही ‘वीरें दी वेडिंग’ मध्ये सोनमसोबत दिसणार आहे.