Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफिना बँकॉकला रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 10:59 IST

नवाब आॅफ पतौडी सैफ अली खान आणि बेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान हे एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते नुकतेच ...

नवाब आॅफ पतौडी सैफ अली खान आणि बेगम आॅफ पतौडी करिना कपूर खान हे एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते नुकतेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकमेकांच्या हातात घेऊन जाताना दिसले. ते काही फिरायला जात नाहीयेत.सैफला एका व्यावसायिक शूटिंगसाठी बँकॉकला जावे लागत आहे. त्यामुळे करिनालाही त्याने सोबत घेतले आहे. तो म्हणतोय की,‘ माझ्या कामासाठी मी जातो आहे आणि करिनासाठी हा ब्रेकच म्हणावा लागेल.’ सैफची ‘रंगून’ साठीची शूटिंग आता संपत आली आहे. करीनाचा ‘उडता पंजाब’ ही १७ जूनला रिलीज होणार आहे.यात करिनाशिवाय शाहीद कपूर, आलिया भट्ट, दिलजित दोसंघ हे असतील. करिना, शाहीदला एकही सीन एकत्र नाहीये. ‘उडता पंजाब’ च्या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळाला असून चित्रपट केव्हा रिलीज होईल याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.