Join us

Shocking: आलिया भट आणि महेश भट विरोधात गुन्हा दाखल, 'सडक 2' रिलीज आधीच सापडला अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 16:48 IST

'सडक 2' रिलीज होण्याआधीच वादात सापडला आहे.

महेश भट यांचा आगामी सिनेमा सडक 2 डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. सडक 2 रिलीज होण्या आधीच वादात सापडला आहे. महेश आणि त्यांची मुलगी आलिया भटविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिनेमात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 सीजेएम मुकेश कुमार यांच्या कोर्टात कलम २९५ अ आणि १२० ब अन्वये तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी ८ जुलैला सुनावणी पार पडेल. या सिनेमाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले असून यात पूजा भट, आलिया भट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 काय आहे हा वादसोशल मीडियावर कैलास पर्वताचा फोटो घेऊन त्यावर सडक 2 लिहून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. कैलास पर्वाताच्या फोटोवर सडक 2 लिहिल्यामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. वकील  प्रिय रंजन अणु यांनी सांगितले की, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश भट्ट, निर्माता मुकेश भट्ट अभिनेत्री आलिया भटचा सिनेमा 'सडक 2' मध्ये कैलास पर्वतचा फोटो दर्शविला गेला आहे. ते म्हणाले, कैलास पर्वत हा हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे म्हणून यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याची पुढील सुनावणी  ८ जुलै २०२० ला होईल. 

टॅग्स :आलिया भटमहेश भट