Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोल्ड सीन दिल्यामुळे 'सेक्रेड गेम्स'मधील 'ही' अभिनेत्री आली होती अडचणीत, अश्लील मेसेजचा करावा लागला होता सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 17:52 IST

सेक्रेड गेम्स २ वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय ठरलेली वेब सीरिज 'सेक्रेड गेम्स'ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'सेक्रेड गेम्स'च्या दुसऱ्या सीझनच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे आणि दुसऱ्या भागाचा ट्रेलरही प्रदर्शित केला. सेक्रेड गेम्स २ वेबसीरिज १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचा पहिला सीजन बऱ्याच सीनमुळे चर्चेत आला होता. त्या सीनपैकी अभिनेत्री राजश्री देशपांडे हिचे बोल्ड सीन चर्चेत आले होते. या सीनमुळे ती अडचणीत आली होती. एका मुलाखतीत खुद्द राजश्रीनेच खुलासा केला. 

'सेक्रेड गेम्स'मध्ये राजश्रीनं नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत बोल्ड सीन केले आहेत. यानंतर लोकांनी तिला अश्लील मेसेज पाठवायला सुरूवात केली. एका मुलाखतीत राजश्रीनं सांगितलं की, 'हे सगळं करणं माझ्यासाठी खूप अवघड होते. मला  वाटलं होतं की हे सीन्स व्हॉट्स अॅपवर व्हायरल होतील. मी याकडे दुर्लक्ष केले. सीनमध्ये दिलेले न्यूड सीन्स आता अॅडल्ट साइटवरही दिसत आहेत. यामुळे लोक मला अॅडल्ट अॅक्ट्रेस समजू लागले आहेत. काही कमेंट्स खूप घाणेरड्या होत्या.'

राजश्रीनं पुढे सांगितलं की,' मला अनुराग कश्यपवर पूर्ण विश्वास आहे. ते मला म्हणाले होते की, जेव्हा सीन करायला काही अडचण नसेल तेव्हा सांग. अशा प्रकारच्या अडचणीला तोंड देण्याची माझी पहिली वेळ नाही.' 

राजश्रीचा मल्याळम चित्रपट 'सेक्सी दुर्गा' शीर्षकावरून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या शीर्षकाला खूप विरोध झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचं नाव बदलून 'एस. दुर्गा' ठेवण्यात आलं.

त्यावेळी तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचं तिनं सांगितलं.

इतकंच नाही तर तिच्यावर अॅसिड फेकण्याच्याही वार्ता झाल्या होत्या.

टॅग्स :सॅक्रेड गेम्सनवाझुद्दीन सिद्दीकी