Join us
Daily Top 2Weekly Top 5

So Cute...! या अभिनेत्रीच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीने केला टीव्ही डेब्यू, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 10:51 IST

अलीकडे बॉलिवूड अभिनेत्री एका जाहिरात झळकली. पण एकटी नाही तर तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीसह.

ठळक मुद्देसुरवीन चावलाने आपल्या करियरची सुरूवात एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’मधून केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने गत एप्रिल महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर सुरवीन कामावरही परतली. अलीकडे ती एका जाहिरात झळकली. पण एकटी नाही तर तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीसह. होय, सुरवीनच्या पाच महिन्यांच्या लेकीनेही टीव्हीवर डेब्यू केला.सुरवीनच्या लेकीचे नाव ईवा आहे. 12 एप्रिल 2019 रोजी जन्मलेल्या ईवाने इतक्या कमी वयात टीव्हीवर डेब्यू केला. जाहिरातीत ईवाचा चेहरा स्पष्ट दिसतोय. सुरवीनने स्वत: या जाहिरातीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. साहजिकच मायलेकी कमालीच्या सुंदर दिसत आहेत. यात सुरवीनने आॅरेंज कलरचा ड्रेस घातला आहे तर ईवाने व्हाईट कलरचा.

सुरवीनने काही महिन्याभरापूर्वी ईवाचा एक फोटो शेअर केला होता. अर्थात यानंतर तिने मुलीचा एकही फोटो शेअर केला नव्हता.नुकतीच सुरवीन ‘सेक्रेड गेम्स 2’या वेबसीरिजमध्ये झळकली. या सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये तिने जोजोची भूमिका साकारली होती. या पहिल्या सीझनच्या शूटिंगवेळी ती प्रेग्नंट होती. 

सुरवीन चावलाने २०१५ साली व्यावसायिक अक्षय ठक्करसोबत इटलीत लग्न केले होते. तिने तब्बल दोन वर्षे लग्न केल्याचे वृत्त लपवून ठेवले होते. २०१७ साली तिने सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून लग्नाचा खुलासा केला होता.  

सुरवीन चावलाने आपल्या करियरची सुरूवात एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’मधून केली होती. या मालिकेत तिने प्रेरणा व मि. बजाज यांच्या छोट्या मुलीची भूमिका केली होती. याशिवाय  हेट स्टोरी, पार्च्ड, क्रिएटर थ्रीडी यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.  

टॅग्स :सुरवीन चावला