Join us

"सहावीत असतानाच आईवडिलांनी मला...", लग्नाच्या प्लॅनिंगवर हृतिकच्या गर्लफ्रेंडचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:51 IST

सबा आजाद लग्न करणार का?

'ग्रीक गॉड' अशी ओळख असलेला हँडसम अभिनेता हृतिक रोशन अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी त्याचा 'वॉर २' रिलीज झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. तर दुसरीकडे हृतिक १२ वर्ष लहान सबा आजादला डेट करत आहे. दोघंही हातात हात घालून कधी डेटवर तर कधी इव्हेंट्सला येतात. तसंच वेगवेगळ्या देशात व्हेकेशनही एन्जॉय करतात. तर आता नुकतंच सबा आजादने लग्नाच्या प्लॅनिंगवर भाष्य केलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सबा आजाद म्हणाली, "मी सहा वर्षांची असताना माझ्या आईवडिलांनी मला बसवलं आणि म्हणाले, 'बेटा, आयुष्यात लग्न करायचंच असं काहीही नाही. तुला नसेल करायचं तर आमची काहीच हरकत नसेल. आम्हाला तुझ्याकडून लग्नाबद्दल काहीच अपेक्षा नाही. तू तुझा निर्णय घे. त्यामुळे मी कसं जगावं याबद्दल कुटुंबाचा कधीच माझ्यावर कसलाही दबाव नव्हता."

ती पुढे म्हणाली, "कलाकार म्हणून मी खूपच हावरट आहे. अभिनयाचा कस लागेल अशा भूमिका करायला मला आवडतात. मी खऱ्या आयुष्यात जशी शहरी मुलगी आहे तेच पडद्यावर साकारणं अवघड नाही. पण एखाद्या भूमिकेतून त्या कॅरेक्टरच्या प्रवासाचा भाग होणं, त्याच्या जगात वावरणं हे मला फार भारी वाटतं. अशा भूमिकांसाठी मी कायम तयार असते."

याआधी हॉलिवूड रिपोर्टरला दिलेल्या मुलाखतीत सबाने हृतिकविषयी भाष्य केलं होतं. ती म्हणालेली, "माझं आयुष्य खूप सामान्य आहे. अगदी आमचं नातंही. जे सतत लोकांच्या नजरेत असतात ते सामान्य आयुष्य जगत नाही असं लोकांनी गृहितच धरलेलं असतं. प्रत्येक जण रोज आपापलं आयुष्य जगतच असतो."

टॅग्स :हृतिक रोशनरिलेशनशिपलग्न