Join us
Daily Top 2Weekly Top 5

६५ दिवस चाललं RRR च्या इंटरव्हल सीनचं शूटींग, एका सीनचा खर्च वाचाल तर अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 12:13 IST

RRR सिनेमासंबंधी अनेक किस्सेही समोर येत आहेत. आता एका इंटरव्हल सीनसाठी एस.एस. राजामौली यांनी किती लाख रूपये खर्च केले याची चर्चा होत आहे. 

'बाहुबली' फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली (S.S.Rajamouli) यांचा सिनेमा RRR ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. त्यानंतर सिनेमाच्या प्रमोशनलाही दणक्यात सुरूवात झाली होती. सिनेमासंबंधी अनेक किस्सेही समोर येत आहेत. आता एका इंटरव्हल सीनसाठी एस.एस. राजामौली यांनी किती लाख रूपये खर्च केले याची चर्चा होत आहे. 

एका मुलाखती दरम्यान एस.एस. राजामौली यांनी सांगितलं की, 'जेव्हा आपल्याकडे इतकं मोठं यूनिट आहे. जर काही चुकीचं झालं तर लाखो रूपये खर्च होतात. आम्ही ६५ रात्रींपर्यंत 'RRR'च्या इंटरव्हलच्या सीक्वेंसचं शूटींग करत होतो. अशात शेकडो कलाकार होते ज्यांना वेगवेगळ्या देशातून बोलवण्यात आलं होतं. प्रत्येक रात्रीच्या शूटींगचा खर्च ७५ लाख रूपये होता'. 

RRR सिनेमा ज्यूनिअर एनटीआर, राम चरण, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारीत आहे. कोरोनाचा देशात वाढता प्रभाव बघता सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. सिनेमा जानेवारी २०२२ मध्ये रिलीज होणार होता. आता हा सिनेमा कधी रिलीज होईल हे सांगण्यात आलेलं नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचं एकूण बजेट ३५० ते ४०० कोटी रूपये आहे. 

RRR च्या कथानकाबाबत सांगायचं तर सिनेमात अल्लूरी सीताराम राजू आणि कोमारम भीम यांच्या जीवनावर आधारीत कथा आहे. एस.एस.राजामौली यांचा सिनेमा RRR चे नॉर्थ इंडियन राइट्स १४० कोटी रूपयांना विकले गेले आहेत. या डीलनंतर सिनेमाने रिलीजआधीच ८९० कोटी रूपयांचा बिझनेस केल्याचा दावा केला जात आहे.  

टॅग्स :एस.एस. राजमौलीराम चरण तेजाआलिया भट