Join us
Daily Top 2Weekly Top 5

रियान आणि राहिल पापा रितेश देशमुखला समजतात ‘पिकासो’, वाचा इंटरेस्टिंग स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 14:31 IST

अभिनेता रितेश देशमुख याला कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि धीरगंभीर भूमिकांसाठी ओळखले जाते. रितेश आपल्या अभिनयाने कुठल्याही भूमिकेला सहज न्याय देतो. ...

अभिनेता रितेश देशमुख याला कॉमेडी, अ‍ॅक्शन आणि धीरगंभीर भूमिकांसाठी ओळखले जाते. रितेश आपल्या अभिनयाने कुठल्याही भूमिकेला सहज न्याय देतो. कदाचित त्यामुळेच त्याने मिळालेला राजकारणाचा वारसा पुढे न नेता अभिनय क्षेत्रात करिअर केले. असो, आज आम्ही रितेशच्या अंगी असलेला आणखी एक गुण सांगणार आहोत. काही दिवसांपूर्वीच रितेशने त्याच्या न्यूयॉर्कस्थित अपार्टमेंटमध्ये आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची शाडूच्या मातीची मूर्ती साकारली होती. आतापर्यंत रितेशने अशा बºयाचशा मूर्ती साकारल्या असून, त्याच्यातील ही कला कौतुकास्पदच म्हणावी लागेल. रितेश मूर्तींबरोबरच आपल्या मुलांसाठी त्यांच्या आवडीचे कार्टून कॅरेक्टर्सचेदेखील पेंटिंग करतो. होय, रियान आणि राहिलचे फेव्हरेट कार्टून कॅरेक्टर तो हुबेहुब साकारतो. याविषयी सांगताना रितेशने म्हटले की, ‘पेंटिंगकरिता माझ्या मुलांकडून मला प्रोत्साहन मिळते. खरं सांगायचे तर मला सर्वात जास्त आनंद या गोष्टीचा होतो की, मी त्यांच्याकरिता पेंटिंग बनवित आहे. ‘द लॉयन किंग’ आणि ‘द जंगल बुक’ याविषयी ते खूपच क्रेजी आहेत. त्यामुळे मी माझ्या मुलांच्या डिमांडनुसार त्यांचे फेव्हरेट कॅरेक्टर्सचे पेंटिंग बनवितो. सर्वात अगोदर मी ‘मुफासा’, त्यानंतर ‘स्कार’ आणि ‘सिंबा’चे पेंटिंग काढले होते. मुलांना हे पेंटिंग एवढे आवडले होते की, ते मला पिकासो समजतात. पत्नी जेनेलिया डिसूझा हिची साथ आणि मुलांची प्रतिक्रिया याविषयी रितेश सांगतो की, ‘जेनेलिया मला याकरिता इनकरेज करीत असते. तीच मला ब्रश आणि पेंट आणून देते. मी जेव्हा एखादी पेंटिंग करतो, ते बघून मुले खूपच रोमांचित होतात. त्यांना असे वाटते की, मी पिकासो असून, त्यांना सर्व्हिस देत आहे.